₹500 ची लाच घेताना RTO अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!

– नागपूर RTO कार्यालयात खळबळ, संपर्कातील दलालांची होईल चौकशी

– मोबाईल सिडिआर काढणार, अल्पवधीत जमवली कोट्यावधीची माया?

The Exposer
नागपूर : नागपूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) मध्ये ₹500 ची लाच स्वीकारताना RTO अधिकारी साजन शेंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे RTO कार्यालयात मोठी खळबळ उडाली असून, संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
तक्रारदाराकडून काम करून देण्यासाठी ₹500 ची मागणी करण्यात आल्याची तक्रार ACB कडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACB ने सापळा रचून कारवाई केली. त्यामध्ये अधिकारी साजन शेंडे हे लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले गेल्याचे सूत्रांनी सांगितले. या कारवाईनंतर RTO कार्यालयातील कामकाज आणि व्यवहारांबाबत विविध चर्चांना उधाण आले असून, ACB पुढील चौकशी करीत आहे. या प्रकरणी लाचखोर शेंडे च्या संपर्कातील दलालांची सुध्दा चौकशी होणार असल्याचे बोलले जाते. या लाचखोरीच्या धंद्यात अनेकांचा सहभाग अशे काय, हे सुध्दा एसीबी तपासून पहाणार आहॆ. यासाठी लाचखोर शेंडेचा मोबाईल सीडीआर काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More