नागपूर पोलिसांची वेबसाईट पुन्हा ठप्प!

– ‘This Site Can’t Be Reached’ ने उघड केली स्थिती
– प्रेस नोटपासून अधिकृत माहितीपर्यंत सर्वकाही बंद

The Exposer
नागपूर : स्मार्ट पोलिसिंग, डिजिटल प्रशासन आणि तंत्रज्ञानाधारित सेवा यांचे मोठमोठे दावे करणाऱ्या नागपूर शहर पोलिसांची अधिकृत वेबसाईट पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. वेबसाईट उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांना, पत्रकारांना आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींना “This Site Can’t Be Reached” हा संदेश दिसत असून, पोलिसांच्या डिजिटल यंत्रणेची विश्वासार्हता पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली आहे.
पोलिस विभागाच्या विविध कारवाया, गुन्हे उघडकीस आणण्याची माहिती, अटक कारवाई, जनजागृती उपक्रम तसेच अधिकृत प्रेस नोट्स याच वेबसाईटवर प्रसिद्ध केल्या जातात. मात्र वेबसाईट बंद पडल्याने अधिकृत माहितीचा मुख्य स्रोतच ठप्प झाला आहे. परिणामी पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांना माहिती मिळविण्यासाठी पर्यायी मार्गांचा आधार घ्यावा लागत आहे.
विश्व्सनिय सूत्रनुसार, वेबसाईट बराच काळ तांत्रिक अडचणींना सामोरी जात आहे. तरीही त्यावर कायमस्वरूपी उपाय करण्यात आलेला नाही. दुसरीकडे, पोलिस यंत्रणा ‘हायटेक’ करण्यात आल्याचा दावा केला जातो, मात्र प्रत्यक्षात मूलभूत डिजिटल सेवा देखील सातत्याने उपलब्ध राहत नसल्याचे चित्र समोर आले आहे.
या संदर्भात पोलिस माहिती व जनसंपर्क विभागाचे उपनिरीक्षक अंकुश राठोड यांच्याशी काही पत्रकारांनी संपर्क साधला असता त्यांनी प्रेस नोट्स प्रसारित करण्यासाठी स्वतंत्र सोशल मीडिया ग्रुप तयार करण्यात आल्याचे सांगितले.
मात्र, त्या ग्रुपमध्ये नसलेल्या पत्रकारांना आणि नागरिकांना अधिकृत माहिती कशी मिळणार, असा प्रश्न विचारला असता त्यांनी “एक-दोन दिवसांत वेबसाईट सुरू होईल” एवढेच उत्तर दिले. तर नागपूर पोलिसांची वेबसाईट वारंवार बंद का पडते? तिची देखरेख आणि तांत्रिक जबाबदारी नेमकी कोणाची? असे विविध प्रश्न यनिमित्ताने उपस्थित झाले आहॆ. या संदर्भात पोलिस माहिती व जनसंपर्क विभागाचे उपनिरीक्षक अंकुश राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, होय, तांत्रिक समस्या उद्भवल्याने वेबसाईट बंद आहॆ. एक दोन दिवसात वेबसाईट सुरु होईल, अशी माहिती राठोड यांनी The Exposer ला दिली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More