कुटूंबात आणि समाजात ज्येष्ठांची उपेक्षा थांबायला हवी – डॉ राजू मिश्रा 

– जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती दिना निमित्त प्रतिष्ठान तर्फे सौहार्द सप्ताह

The Exposer
नागपूर : समाजात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांच्या प्रती वाढत चाललेली उपेक्षा आणि प्रताडना थांबावी आणि ज्येष्ठ जनांना सन्मान आणि स्वाभिमानाने जगता येईल असे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी समाजाच्या प्रत्येक घटकांनी स्वीकारावी, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे सचिव डॉ राजू मिश्रा यांनी केले आहे.

ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती दिना निमित्त ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान तर्फे आयोजित सौहार्द सप्ताहाच्या उदघाटन कार्यक्रमात डॉ मिश्रा बोलत होते. या सौहार्द सप्ताहा अंतर्गत 15 जून रोजी उदघाटन कार्यक्रम पार पडला. तसेच ज्येष्ठ नागरिक मंडळांना संलग्नता प्रमाणपत्रांचे वितरण, वृद्धाश्रमात भोजन दान आदी कार्यक्रम पार पडले. आज राज्य आणि केंद्र सरकार दरबारी प्रलंबित ज्येष्ठ नागरिकांच्या हिताच्या विविध मागण्यांची दोन निवेदने जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिष्ठानच्या सदस्यांनी सोपविले आणि चर्चा केली.

हतबल, एकाकी, गरजवंत ज्येष्ठ नागरिकांना घरपोच आरोग्य सेवा मिळावी, त्यांना सुरक्षित जगता यावे म्हणून पोलीस विभागाने त्यांची काळजी घ्यावी, एस टी प्रवासासह प्रत्येक सवलती करिता त्या त्या विभागाचे वेगवेगळे कार्ड सक्तीचे न करता आधार कार्डच सर्व सवलती करिता पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावे, अशी वेगवेगळी ओळखपत्रे तयार करण्यासाठी ज्येष्ठ लोकांना तासंतास लाईनीत लागावे लागते, शिवाय प्रत्येक कार्डासाठी फी भरावी लागते, हा प्रकार म्हणजे ज्येष्ठ जनांचा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळच होय. तो सरकारने त्वरित थांबवावा, अशा राज्य सरकार कडे तर रेल्वे प्रवासाची सवलत परत सुरू करावी आणि ज्येष्ठ नागरिक जगू शकेल किमान ईतकी पेंशन लागू करावी अशा काही मागण्या पंतप्रधानांना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

या सप्ताहात नातवाचे नावे एक झाड आजोबांचे (वृक्षारोपण) कार्यक्रम, 21 तारखेला योग दिवस, आजनसरा देवस्थान येथे 22 तारखेला ग्रामीण ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यावर चर्चा कार्यक्रम आणि 23 तारीखेला सेवाग्राम आश्रमात समारोप कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती सुद्धा डॉ राजू मिश्रा यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला गेलेल्या शिष्टमंडळात प्रतिष्ठानच्या सेवा समितीचे सदस्य मधुकर दहिकर, बिपीन तिवारी, अंगदसिंग सोलंकी, डाॅ मिलींद वाचनेकर, सुनील अडबे आणि एड. किरण मोहिते यांचा समावेश होता.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More