बांबूपासून निर्मित तिरंग्याने नागपूरचे नवे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांचे मनस्वी स्वागत

– आ. सुधीर मुनगंटीवार यांची सदिच्छा भेट; कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि लोकाभिमुख नेतृत्वावर व्यक्त केला ठाम विश्वास

The Exposer
नागपूर : राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांची सदिच्छा भेट घेत त्यांचे बांबूपासून निर्मित तिरंगा ध्वज भेट देऊन मनस्वी स्वागत केले.

यावेळी विश्वास नांगरे-पाटील यांच्या कर्तव्यनिष्ठा, धैर्य, शिस्तप्रियता आणि लोकाभिमुख कार्यशैलीचे कौतुक करण्यात आले. त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवाचा नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेला निश्चितच मोठा लाभ होईल, तसेच अधिक सक्षम, संवेदनशील आणि जनविश्वास दृढ करणारे पोलीस प्रशासन उभारण्यात त्यांचे नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

नागपूर शहराच्या सेवेत त्यांचा कार्यकाळ यशस्वी, प्रभावी आणि जनहिताला समर्पित ठरो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या. सदिच्छा भेटीदरम्यान शहराच्या सुरक्षिततेसह नागरिकाभिमुख पोलीस व्यवस्था अधिक बळकट करण्याबाबत सकारात्मक अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More