अखिल भारतीय सर्वधर्म समाज पार्टीच्या नागपूर शहराध्यक्षपदी विनील चौरसिया!

– नागपूरच्या विविध समस्यांसाठी लढणार; सर्व समाजघटकांना जोडण्याचा निर्धार

The Exposer
नागपूर : अखिल भारतीय सर्वधर्म समाज पार्टीच्या नागपूर शहराध्यक्षपदी ज्येष्ठ समाजसेवक विनील चौरसिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खलासी लाईन, गड्डीगोदाम येथील पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अब्दुल वहीद पटेल यांच्या हस्ते चौरसिया यांना नियुक्तिपत्र प्रदान करून त्यांचे स्वागत करण्यात आले.

नियुक्तीनंतर विनील चौरसिया यांनी नागपूर शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी पक्ष सक्रियपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज बुलंद करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

“पक्षाचे कार्यालय सर्व नागरिकांसाठी सदैव खुले राहील. सामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील,” असे चौरसिया यांनी स्पष्ट केले. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार उभे करून निवडणूक लढविण्याचा निर्धारही पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

या नियुक्ती कार्यक्रमाला राष्ट्रीय उपाध्यक्ष पांडुरंग शेंडे, भारत पानतावणे, डॉ. अब्दुल बारी, मार्शल देवेंद्र वाघमारे, चंद्रभान चकोले, देवेंद्र सोनकुसरे (देवाभाऊ), उत्तर नागपूर अध्यक्ष बंडू कापसे, ज्ञानेश्वर हेडाऊ, चेतन तिवारी, सुधीर निकोसे, हेमंत खडसे, मोहन भैसारे आणि नंदकिशोर उईके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त नागपूर शहराध्यक्ष विनील चौरसिया यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More