‘युवा संवाद’मधून यशाचा मंत्र; नागपुरात IAS अधिकारी तुकाराम मुंढे विद्यार्थ्यांशी साधणार थेट संवाद

– स्टुडंट्स राईट्स असो. ऑफ इंडिया व स्टुडंट्स राईट्स फाउंडेशनचा पुढाकार; 2 ऑगस्ट रोजी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजन

The Exposer
नागपूर : स्पर्धा परीक्षा, करिअर, प्रशासन आणि नेतृत्व या विषयांवर विद्यार्थी व युवकांना थेट मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने स्टुडंट्स राईट्स असो. ऑफ इंडिया आणि स्टुडंट्स राईट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवा संवाद’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे आयुक्त, अन्न व औषध प्रशासन (FDA) महाराष्ट्र तथा ज्येष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे (IAS) हे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार आणि युवकांशी थेट संवाद साधणार आहेत. प्रशासनातील अनुभव, यशस्वी कारकीर्द, नेतृत्व कौशल्य, शासकीय सेवेत प्रवेशासाठी आवश्यक तयारी तसेच सामाजिक उत्तरदायित्व यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर ते मार्गदर्शन करणार आहेत.

हा कार्यक्रम रविवार, 2 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता रेशीमबाग, नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश मोफत असून आयोजकांनी प्रसिद्ध केलेल्या QR Code द्वारे इच्छुकांनी आपला फ्री ई-पास नोंदवून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

आयोजकांच्या मते, युवकांना प्रेरणा देणारा, स्पर्धा परीक्षेची दिशा स्पष्ट करणारा आणि प्रशासनातील वास्तव समजून घेण्याची संधी देणारा हा संवाद विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. दुसरीकडे, या कार्यक्रमाला आणखी विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण पुण्यात नुकतेच प्रकाशित झालेल्या ‘तुकाराम’ या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवास, प्रशासनातील तत्त्वनिष्ठ भूमिका, निर्णयक्षमता आणि जनसेवेच्या ध्यासावर प्रकाश टाकला जाणार आहे. पुस्तकातून उलगडणाऱ्या विविध अनुभवांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यश, प्रामाणिकपणा आणि नेतृत्वाचे धडे मिळणार असल्याने विध्यार्थ्यांच्या दृष्टीने कार्यक्रमाला विषेश महत्व आले आहॆ.

‘तुकाराम’ या पुस्तकातून उलगडणाऱ्या प्रेरणादायी प्रवासाची ओळख आणि प्रत्यक्ष तुकाराम मुंढे यांच्याशी संवाद साधण्याची दुर्मिळ संधी या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने नागपूरसह संपूर्ण विदर्भातील युवकांमध्ये या कार्यक्रमाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More