– नागरिकांच्या मदतीसाठी विभागनिहाय हेल्पलाईन केली जाहीर
– आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन
The Exposer
नागपूर : सध्या सुरू असलेल्या पावसाळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत नगर पंचायत बेसा–पिपळा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनासाठी विभागनिहाय संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत. अतिवृष्टी, रस्त्यांवर पाणी साचणे, झाडे पडणे, गटारे तुंबणे किंवा इतर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी आपल्या प्रभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नगर पंचायत प्रशासनाने प्रभागनिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांचे मोबाईल क्रमांक सार्वजनिक केले आहेत. त्यामुळे आपत्कालीन तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देणे आणि आवश्यक ती मदत पोहोचविणे अधिक सुलभ होणार आहे.
प्रभागनिहाय संपर्क अधिकारी :
प्रभाग १ व २ – श्री. मनोज कावळे – 7620740544
प्रभाग ३ व ४ – श्री. मोहित राजनकर – 9673399962
प्रभाग ५ व ६ – श्री. विजय सुरवसे – 8007619445
प्रभाग ७ व ८ – श्री. अजय वाघमारे – 9763596756
प्रभाग ९ व १० – श्रीमती पूजा जाधव – 7218705863
प्रभाग ११ व १२ – श्री. विष्णू गायकवाड – 7972409233
प्रभाग १३ व १४ – श्री. नितीन इमले – 7020385009
प्रभाग १५ व १६ – श्री. राहुल शेलवट – 8788361573
प्रभाग १७ – श्री. अभिजीत हांडे – 9205376761
यासंदर्भात बेसा-पिपला नगर पंचायतचे मुख्याधिकारी भारत नंदनवार यांनी आवाहन केले की, नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास घाबरून न जाता संबंधित अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधावा. प्रशासनाकडून पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे नगरपंचायत मुख्याधिकारी भारत नंदनवार यांनी सांगितले.

Author: संतोष तायडे
संपादक











