The Exposer
नागपूर : इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजाबक्षा मैदानाजवळ सिमेंटच्या ओट्यावर बेशुद्धावस्थेत आढळलेल्या अनोळखी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
सुमारे ५० वर्षे वयाचा एक अनोळखी व्यक्ती राजाबक्षा मैदानाजवळील सिमेंटच्या ओट्यावर बेशुद्धावस्थेत आढळून आला. नागरिकांनी तत्काळ त्याला उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच इमामवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
Author: संतोष तायडे
संपादक
Post Views: 20











