The Exposer
नागपूर : खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भानेगाव शिवाराजवळ कन्हान नदीच्या किनारी शनिवारी रात्री एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
मृत युवकाचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नदीतून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविला.
दरम्यान, मृत युवकाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्याच्या ओळखीबाबत पोलिसांकडून माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे.
Author: संतोष तायडे
संपादक
Post Views: 22











