The Exposer
नागपूर : पंजाबला गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून तब्बल लाख १० हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला चोरीची ही घटना बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जय दुर्गा सोसायटी मनीषनगर येथे घडली.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून बंद घरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. फिर्यादी तुषार दर्शन वाधवा (३६) हे कुटुंबासह जय दुर्गा सोसायटीत राहतात. ४ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे २ वाजता वाधवा कुटुंबीय पंजाबला गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाट फोडून ६० हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ९ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
कुटुंबीय घरी परतल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कपाटातील मौल्यवान वस्तू गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ बेलतरोडी पोलिसांना माहिती दिली. घटनेची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, संशयितांच्या हालचालींचा शोध घेतला जात आहे.
Author: संतोष तायडे
संपादक










