– महाशिष्यवृत्ती प्रणालीवर 2026-27 पासून ऑनलाइन अर्ज; जात व उत्पन्न प्रमाणपत्रासह बँक खाते, KYC आणि आधार लिंकिंग पूर्ण ठेवण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन
The Exposer
नागपूर : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महाशिष्यवृत्तीच्या एकात्मिक संगणकीय प्रणालीद्वारे महाडीबीटी 2.0 पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी वेळ न दवडता ऑनलाइन अर्ज सादर करून शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुळकर्णी यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सन 2026-27 पासून महाशिष्यवृत्ती या एकात्मिक संगणकीय प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संपूर्ण कार्यपद्धती, विविध योजनांचे निकष, पात्रता आणि शिष्यवृत्ती लाभाचा तपशील महाडीबीटी 2.0 पोर्टलवरील युजर मॅन्युअलमध्ये उपलब्ध आहे.
या योजनांचा मिळणार लाभमहाशिष्यवृत्ती
प्रणालीअंतर्गतसावित्रीबाईफुलेशिष्यवृत्तीयोजना, अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, इयत्ता 9 वी व 10 वीतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती तसेच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे मॅट्रिकपूर्व शिक्षण फी व परीक्षा फी यांसह विविध योजना राबविण्यात येणार आहेत.
इयत्ता 9 वी व 10 वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र आणि अद्ययावत उत्पन्न प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
शिष्यवृत्ती थेट बँक खात्यात
शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात थेट ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित राहू नयेत यासाठी पालकांनी काही महत्त्वाच्या बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
– विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र उपलब्ध ठेवावे.
– उत्पन्नाचे प्रमाणपत्र अद्ययावत करून घ्यावे.
– विद्यार्थ्यांचे बँक खाते चालू व अद्ययावत ठेवावे.
– बँक खात्याची KYC पूर्ण करून घ्यावी.
– आवश्यकतेनुसार आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक/सीड करून घ्यावा.
– विद्यार्थीचे नाव, जन्मतारीख व इतर तपशील सर्व कागदपत्रांमध्ये अचूक असल्याची खात्री करावी.
– शाळेमार्फत मागविण्यात येणारी आवश्यक कागदपत्रे विहित मुदतीत जमा करावीत.
एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.
अर्ज व माहितीसाठी संकेतस्थळ
शिष्यवृत्ती अर्ज, पात्रता, योजनांचे निकष आणि अर्ज करण्याची कार्यपद्धती याबाबत अधिक माहितीसाठी महाडीबीटी 2.0 पोर्टलला भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याशी संपर्क साधावा.
Author: संतोष तायडे
संपादक















