– २६-२७ सप्टेंबरला ‘राष्ट्रीय आरक्षण परिषद-२०२६’
– २३ सप्टेंबरला पत्रकार परिषदेत कार्यक्रमाची रूपरेषा होणार जाहीर
The Exposer
नागपूर : आरक्षणाशी संबंधित विविध प्रश्न, सामाजिक न्याय आणि आगामी धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी नागपुरात ‘राष्ट्रीय आरक्षण परिषद-२०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद २६ व २७ सप्टेंबर २०२६ रोजी होणार असून, परिषदेची उद्दिष्टे, कार्यक्रमाची रूपरेषा आणि चर्चेतील विविध विषयांची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही पत्रकार परिषद २३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता रवि भवन, नागपूर येथील परिषद सभागृहात होणार आहे. परिषदेत कोणते मुद्दे मांडले जाणार आहेत, त्याची रूपरेषा तसेच राष्ट्रीय आरक्षण परिषदेमागील भूमिका याबाबत आयोजकांकडून माहिती दिली जाणार आहे.
राष्ट्रीय आरक्षण परिषद-२०२६च्या माध्यमातून आरक्षणाच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी कळविले आहे. त्यामुळे या परिषदेकडे सामाजिक आणि राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
पत्रकारांना उपस्थितीचे आवाहन
या पत्रकार परिषदेस सर्व दैनिकांचे संपादक, उपसंपादक, वार्ताहर, वृत्तवाहिन्या आणि वृत्तसंस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून कार्यक्रमास प्रसिद्धी द्यावी, असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे. अशी माहिती छाया खोब्रागडे, सुदेश भोवते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
Author: संतोष तायडे
संपादक















