– इंदोरा, कामठी, सक्करदरा वाहतूक परिमंडळांसह अपघात व रस्ता सुरक्षा विभागाची जबाबदारी बदलली
The Exposer
नागपूर : नागपूर शहर वाहतूक विभागातील पाच पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त्या बदलण्यात आल्या आहेत. पोलीस उपायुक्त, वाहतूक, नागपूर शहर यांच्या कार्यालयाने यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना आदेश प्राप्त होताच नव्या नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आदेशानुसार पोलीस निरीक्षक महेंद्र सुखदेव अंभोरे यांची रस्ता सुरक्षा विभाग, वाहतूक, नागपूर शहर येथून वाहतूक परिमंडळ इंदोरा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुरेश चमरुजी मटाटमी यांची वाहतूक परिमंडळ इंदोरा येथून अपघात विभाग, वाहतूक, नागपूर शहर येथे बदली करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक मनीष बनसोड यांची वाहतूक परिमंडळ कामठी, यशोधानगर शहर येथून रस्ता सुरक्षा विभाग, वाहतूक, नागपूर शहर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक महादेव उत्तम भारसाकळे हे वाहतूक विभागात दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी हजर झाल्यानंतर त्यांची वाहतूक परिमंडळ कामठी, नागपूर शहर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे यांची अपघात विभाग, वाहतूक, नागपूर शहर येथून वाहतूक परिमंडळ सक्करदरा, नागपूर शहर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
वाहतूक पोलिसिंगमध्ये जबाबदाऱ्यांची फेररचना
या नियुक्त्यांमुळे शहरातील विविध वाहतूक परिमंडळांसह अपघात प्रतिबंध आणि रस्ता सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल झाला आहे. प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या या फेरबदलानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी नव्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















