शिंदे-पवार सरकारची १०० कोटींची चालना; दशकभराच्या संघर्षाचे स्वप्न आता प्रत्यक्षात

– फुले विचारांच्या राष्ट्रीय स्मारकाला मिळतेय आकार; सामाजिक न्यायाच्या लढ्याचा ऐतिहासिक विजय

The Exposer
नागपूर : भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीसाठी पुढील काळात राज्य शासनाने मोठे पाऊल उचलले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्मारकासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी ५० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करून प्रकल्पाला नवी गती दिली. त्यामुळे राष्ट्रीय स्मारक उभारणीचा मार्ग अधिक सुकर झाला असून आज स्मारकाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे.

सामाजिक कार्यकर्ते भूषण दडवे यांनी सांगितले की, फुले दाम्पत्यांच्या वारसांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरू केलेला संघर्ष आजही सुरू आहे. वारसांचे हक्क, त्यांच्या मागण्या आणि महात्मा फुले-सावित्रीबाई फुले यांच्या ऐतिहासिक वारसाचे जतन करण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.

शासनाने दिले होते चार महत्त्वाचे निर्देश

• फुले दाम्पत्यांच्या मालमत्ता आणि वारसांच्या हक्कांची चौकशी
• खानवडी येथील जमिनींच्या नोंदींची पडताळणी
• भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक उभारणीची प्रक्रिया सुरू करणे
• वारसदारांना शासकीय मदत, नोकरी व इतर योजनांचा विचार करणे

भारतातील स्त्रीशिक्षणाचा पाया ज्या भिडे वाड्यात रचला गेला, त्या ऐतिहासिक वास्तूचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर होणे हा केवळ एका वास्तूचा विकास नसून सामाजिक न्याय, स्त्रीशिक्षण आणि समतेच्या विचारांचा विजय मानला जात आहे. आज पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाड्याच्या जागेवर महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक आकार घेत आहे. फुले विचारांचा वारसा जपणारे हे स्मारक भविष्यात लाखो नागरिकांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे. “भिडे वाड्यापासून राष्ट्रीय स्मारकापर्यंतचा प्रवास हा सामाजिक न्यायासाठी झालेल्या सातत्यपूर्ण लोकसंघर्षाचा विजय आहे,” अशी भावना फुले विचारांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More