महायुतीच्या संख्याबळासमोर काँग्रेस निष्प्रभ; डॉ. राजीव पोतदारांचा विधान परिषदेत विजयी प्रवेश!

– महायुतीसाठी मोठा राजकीय ‘बूस्टर’, तर काँग्रेससमोर पुन्हा संघटनात्मक आव्हाने 

The Exposer
नागपूर : नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद पोटनिवडणुकीत महायुतीचे उमेदवार डॉ. राजीव पोतदार यांनी काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळविला.

भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती.नागपूर जिल्ह्यातील महापालिका, नगर परिषद, नगर पंचायत व कॅन्टोन्मेंट बोर्डातील निवडून आलेले लोकप्रतिनिधी या निवडणुकीचे मतदार होते.

महायुतीकडे स्पष्ट संख्याबळ असल्याने सुरुवातीपासूनच डॉ. पोतदार यांना आघाडी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या विजयामुळे विदर्भातील महायुतीचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल महायुतीसाठी मोठा राजकीय बूस्टर मानला जात आहे. दुसरीकडे काँग्रेससमोरील संघटनात्मक आव्हाने पुन्हा एकदा उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दुसरीकडे, काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी ऐनवेळेवर पक्षाच्या आदेशाने निवडणूक लढण्याची तयारी दर्शविली, आणि हीच बाब त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली आहॆ, हे विशेष.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More