आषाढी एकादशी : संस्कार आणि पर्यावरणाचा संदेश

– पालखी सोहळा व वृक्षारोपणातून विद्यार्थ्यांना संस्कृतीचे धडे

The Exposer
नागपूर : आषाढी एकादशीनिमित्त अन्नी इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या पालखी सोहळा आणि वृक्षारोपण उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे हे दोन्ही उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरले.

शाळेत पार पडलेला पालखी सोहळा विद्यार्थ्यांसाठी संस्कारमय आणि आनंददायी अनुभव ठरला. या माध्यमातून मुलांना आपल्या संस्कृतीची, परंपरेची तसेच वारकरी संप्रदायाच्या मूल्यांची ओळख करून देण्यात आली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, एकता, सामाजिक बांधिलकी आणि भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण होण्यास मदत होते.

याचबरोबर आषाढी एकादशीनिमित्त आयोजित वृक्षारोपण उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. हरित भविष्य घडविण्यासाठी वृक्ष लागवड आणि त्यांचे संवर्धन ही काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

या दोन्ही उपक्रमांचे शाळेचे व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि सर्व सहभागी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, भविष्यातही असे सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने आयोजित व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More