हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यातून अट्टल घरफोड्या ‘एक्का’ फरार

– शहर पोलिस दलात उडाली खळबळ

The Exposer
नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या ताब्यात असलेला अट्टल घरफोडीचा आरोपी आज (सोमवारी) सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्याने नागपूर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. फरार आरोपीचे नाव इक्का उर्फ हर्ष महेंद्र रामटेके (रा. तिरोडा, जि. गोंदिया) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मानेवाडा स्मशानभूमीतील पवन सूर्यवंशी हत्याकांडातील सात आरोपीं सह इक्का यालाही हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. सकाळच्या वेळी लॉकअपमधील शौचालयात एका आरोपी गेला असताना इक्का यानेही “शौचाला जायचे आहे” असा आग्रह धरला. त्यानंतर लॉकअप गार्ड त्याला बाहेरील शौचालयात घेऊन गेला.

याच संधीचा फायदा घेत इक्का याने गार्डची नजर चुकवत तेथून धूम ठोकली. आरोपी फरार झाल्याचे लक्षात येताच पोलीस ठाण्यात एकच धावपळ उडाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने माहिती देण्यात आली असून शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More