– एमआयडीसी हद्दीतील अमरनगरात घडली घटना; जुन्या वैमनस्यातून रक्तपात
The Exposer
नागपूर : नागपूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरनगर परिसर सोमवारी सकाळी सुमारे ९.३० वाजता रक्तरंजित हल्ल्याने हादरला. रोशन तराळ या आरोपीने धारदार शस्त्राने केलेल्या भीषण हल्ल्यात संगीता चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला, तर डहाट दाम्पत्य जखमी झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मृतक संगीता चौधरी या जखमी डहाट यांच्या साळी असल्याचे सांगितले जात आहे. आरोपी रोशन तराळ हा पीडित कुटुंबाचा माजी किरायेदार असून, जुन्या वैमनस्यातून हा जीवघेणा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जखमीमध्ये दहाट यांच्या मुलीचा समावेश असल्याचे सांगितल्या जाते.
धारदार शस्त्राने झालेल्या या अचानक हल्ल्यामुळे अमरनगर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून फरार आरोपी रोशन तराळचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या रक्तरंजित घटनेमागील नेमके कारण काय, तसेच हल्ल्याचे संपूर्ण कारणमीमांसा तपासानंतर स्पष्ट होणार असून, एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Author: संतोष तायडे
संपादक











