– पीडितेची सुटका, अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल
The Exposer
नागपूर : गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने देहव्यवसायाविरोधात मोठी कारवाई करत कळमणा परिसरातून एका महिलेला अटक केली असून तिच्या तावडीतून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे २.४० वाजता गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कळमणा वस्ती, सरस्वती नगर येथील एका घरावर पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला.
&या कारवाईत संगीता दौलतराव सोनुने (वय ४९) हिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांना जागा उपलब्ध करून देत पीडित महिलेकडून देहव्यवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एका पीडित महिलेची सुटका केली. कारवाईदरम्यान आरोपीकडून रोख २,००० रुपये आणि दोन जुने मोबाईल फोन असा एकूण ₹३,०२० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी कळमणा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १४३(२) तसेच अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक अधिनियमातील कलम ३, ४ व ५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीला पुढील कारवाईसाठी कळमणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, पोलीस उपआयुक्त (डिटेक्शन) दीपक अग्रवाल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दर्शन पाटील व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
Author: संतोष तायडे
संपादक











