– गुन्हेशाखा युनिट क्र. ६ ची कारवाई; अशोक मेंढे, मंगेश वानखेडेसह १३ जणांना अटक
The Exposer
नागपूर : गुन्हेशाखा, युनिट क्र. ६ ने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुडको कॉलनी परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत चंद्रशेखर बालकदास साबळे (५१), अशोक ज्ञानेश्वर मेंढे (४४), मंगेश श्रीहरी वानखेडे (४८), जगमिंदर गुरुमीतसिंग बग्गा (२३), अमित शिलनाथ नितनवरे (३६), राजेश दीपक कापसे (४६), राहुल तुकाराम वाळटे (४२), प्रविण सुरेश भोवते (३६), कमल शिवनाथ नितनवरे (३३), सिनु मुंगेश्वर सेतीयाद (२८), सचिन संभाजी तोडसाम (४२), दुर्गेश नंदलाल शाह (३४) आणि अनुप अनिल धमगाये (३६) अशा एकूण १३ आरोपींना अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी चंद्रशेखर बालकदास साबळे, अशोक ज्ञानेश्वर मेंढे, मंगेश श्रीहरी वानखेडे, जगमिंदर गुरुमीतसिंग बग्गा, अमित शिलनाथ नितनवरे, राजेश दीपक कापसे, राहुल तुकाराम वाळटे, प्रविण सुरेश भोवते, कमल शिवनाथ नितनवरे आणि सिनु मुंगेश्वर सेतीयाद हे सर्व हुडको कॉलनी, जरीपटका, नागपूर येथील रहिवासी आहेत. तर सचिन संभाजी तोडसाम हे प्लॉट क्र. ५२४, कुशीनगर, जरीपटका, दुर्गेश नंदलाल शाह हे प्लॉट क्र. ३६, मिसाळ ले-आऊट, जरीपटका, तसेच अनुप अनिल धमगाये हे प्लॉट क्र. ३२, अंगुलीमाळ नगर, कपीलनगर, नागपूर येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कारवाईदरम्यान आरोपींकडून ₹३५,००० रोख रक्कम, विविध कंपन्यांचे ११ मोबाईल फोन, ताशपत्ते व इतर साहित्य असा एकूण ₹१,५७,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व आरोपींविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईनंतर जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत इतका मोठा जुगार अड्डा सुरू असताना स्थानिक पोलिसांना त्याची माहिती नव्हती का? की त्याकडे दुर्लक्ष झाले होते? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, या संदर्भात पोलिसांकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेले नाही.
सदर कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त (डिटेक्शन) दीपक अग्रवाल आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा, युनिट क्र. ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने केली.
Author: संतोष तायडे
संपादक











