गवसी मानापूर येथे भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

– एक पुरुष, एक महिला आणि मुलाचा दुर्दैवी अंत; ४ ते ५ वर्षांचा चिमुकला गंभीर जखमी, ICU मध्ये उपचार सुरू

The Exposer
नागपूर : वर्धा रोडवरील गवसी मानापूर परिसरात भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत एक पुरुष, एक महिला आणि एका मुलाचा असा तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.

या अपघातात ४ ते ५ वर्षांचा आणखी एक मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने विवेकानंद हॉस्पिटल, खापरी येथे दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर ICU मध्ये उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच हिंगणा पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, अपघाताचा नेमका प्रकार आणि कारणांचा तपास सुरू आहे.

या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघातातील मृतांची ओळख आणि घटनेचा सविस्तर तपशील पोलिसांच्या अधिकृत तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More