– जागतिक सायकल दिनानिमित्त नागरिकांना सहभागाचे आवाहन

The Exposer
नागपूर : पंतप्रधानांच्या फिट इंडिया अभियानाला बळ देण्यासाठी आणि नागरिकांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश पोहोचविण्यासाठी नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने जागतिक सायकल दिनानिमित्त पोलिस जिमखाना येथे ७ जून २०२६ रोजी सकाळी ६.३० वाजता ‘Sunday on Cycle’ (संडे ऑन सायकल) या विशेष सायकल रॅलीचे आयोजन पोलिस जिमखाना येथे करण्यात आले आहे.
हा उपक्रम नागपूर शहर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असून नागरिकांमध्ये फिटनेस, पर्यावरण संवर्धन आणि सायकल वापराबाबत जनजागृती करण्याचा उद्देश आहे.
या कार्यक्रमात पोलीस अधिकारी, कर्मचारी, विविध सायकलिंग ग्रुप्स, क्रीडाप्रेमी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
पोलीस प्रशासनाने सर्व पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि इतर माध्यम प्रतिनिधींना कार्यक्रमाच्या वृत्तांकन, व्हिडिओ शूटिंग व छायाचित्रणासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











