– ९० पोती गहू भरलेले वाहन क्राइम ब्रांचच्या जाळ्यात
– रेशन धान्याच्या काळाबाजाराचा मोठा पर्दाफाश होणार?
The Exposer
नागपूर : नागपूर शहरात रेशन धान्याच्या काळाबाजाराविरोधात क्राइम ब्रांचने मोठी आणि धडक कारवाई करत तब्बल ९० पोती गहू भरलेले आयशर वाहन ताब्यात घेतले आहे. जप्त करण्यात आलेला गहू सार्वजनिक वितरण प्रणालीतील (रेशन) असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या कारवाईमुळे खाद्यान्न माफियांच्या नेटवर्कमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, क्राइम ब्रांच युनिट-३चे पोलिस निरीक्षक अमित देशमुख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर मंगळवारी रात्री सापळा रचण्यात आला. या कारवाईत गव्हाने भरलेले आयशर वाहन अडवून तपासणी करण्यात आली. वाहनात सुमारे ९० पोती गहू, प्रत्येकी ५० किलो वजनाचे, आढळून आले. म्हणजेच जवळपास ४.५ टन गव्हाचा साठा पोलिसांनी जप्त केला.
कारवाईनंतर गहू आणि वाहन पारडी पोलिस ठाण्यात सुरक्षित ठेवण्यात आले असून, याबाबतची माहिती तत्काळ खाद्यान्न पुरवठा विभागाला देण्यात आली आहे. मात्र मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अधिकाऱ्यांना बुधवारी नमुने तपासण्यासाठी घटनास्थळी पोहोचता आले नाही.
रेशनचा गहू की खासगी माल?
आता सर्वांचे लक्ष खाद्यान्न पुरवठा विभागाच्या अहवालाकडे लागले आहे. तपासात जप्त गहू रेशन दुकानांसाठी मंजूर केलेला सरकारी धान्यसाठा असल्याचे सिद्ध झाल्यास, तो कोणत्या रेशन दुकानातून बाहेर पडला आणि कुठे विक्रीसाठी नेला जात होता, याचा मोठा तपास सुरू होणार आहे.
खाद्यान्न माफियांना धक्का
सूत्रांच्या माहितीनुसार, नागपुरात रेशन धान्याच्या काळाबाजाराशी संबंधित जाळे अनेक वर्षांपासून सक्रिय आहे. काही रेशन दुकानदार आणि दलालांच्या संगनमतातून सरकारी धान्य खुले बाजारात विकले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. अशा परिस्थितीत क्राइम ब्रांचची ही कारवाई खाद्यान्न माफियांसाठी मोठा धक्का मानली जात आहे.
अहवालानंतर होणार मोठा खुलासा
सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, खाद्यान्न पुरवठा विभागाच्या अहवालानंतरच या प्रकरणातील सत्य समोर येणार आहे. जर हा गहू रेशनचा असल्याचे निष्पन्न झाले, तर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागपूर : नागपूर शहरात रेशन धान्याच्या काळाबाजाराविरोधात क्राइम ब्रांचने मोठी आणि धडक कारवाई करत तब्बल ९० पोती गहू भरलेले आयशर वाहन ताब्यात घेतले आहे. जप्त करण्यात आलेला गहू सार्वजनिक वितरण प्रणालीतील (रेशन) असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या कारवाईमुळे खाद्यान्न माफियांच्या नेटवर्कमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, क्राइम ब्रांच युनिट-३चे पोलिस निरीक्षक अमित देशमुख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर मंगळवारी रात्री सापळा रचण्यात आला. या कारवाईत गव्हाने भरलेले आयशर वाहन अडवून तपासणी करण्यात आली. वाहनात सुमारे ९० पोती गहू, प्रत्येकी ५० किलो वजनाचे, आढळून आले. म्हणजेच जवळपास ४.५ टन गव्हाचा साठा पोलिसांनी जप्त केला.
कारवाईनंतर गहू आणि वाहन पारडी पोलिस ठाण्यात सुरक्षित ठेवण्यात आले असून, याबाबतची माहिती तत्काळ खाद्यान्न पुरवठा विभागाला देण्यात आली आहे. मात्र मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अधिकाऱ्यांना बुधवारी नमुने तपासण्यासाठी घटनास्थळी पोहोचता आले नाही.
रेशनचा गहू की खासगी माल?
आता सर्वांचे लक्ष खाद्यान्न पुरवठा विभागाच्या अहवालाकडे लागले आहे. तपासात जप्त गहू रेशन दुकानांसाठी मंजूर केलेला सरकारी धान्यसाठा असल्याचे सिद्ध झाल्यास, तो कोणत्या रेशन दुकानातून बाहेर पडला आणि कुठे विक्रीसाठी नेला जात होता, याचा मोठा तपास सुरू होणार आहे.
खाद्यान्न माफियांना धक्का
सूत्रांच्या माहितीनुसार, नागपुरात रेशन धान्याच्या काळाबाजाराशी संबंधित जाळे अनेक वर्षांपासून सक्रिय आहे. काही रेशन दुकानदार आणि दलालांच्या संगनमतातून सरकारी धान्य खुले बाजारात विकले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. अशा परिस्थितीत क्राइम ब्रांचची ही कारवाई खाद्यान्न माफियांसाठी मोठा धक्का मानली जात आहे.
अहवालानंतर होणार मोठा खुलासा
सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, खाद्यान्न पुरवठा विभागाच्या अहवालानंतरच या प्रकरणातील सत्य समोर येणार आहे. जर हा गहू रेशनचा असल्याचे निष्पन्न झाले, तर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Author: संतोष तायडे
संपादक