-चार गुन्हे उघड, सराईत वाहनचोराला कळमणा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
The Exposer
नागपूर : नागपूर शहरात दुचाकी चोरीच्या घटनांनी नागरिकांची डोकेदुखी वाढली असताना कळमणा पोलिसांनी एका सराईत वाहनचोराला अटक करून चार दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलिसांनी आरोपीकडून तब्बल १ लाख २० हजार रुपयांच्या चार चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव निलेश ज्ञान देवाडे (वय २०, रा. गुलमोहर नगर, कळमणा) असे असून त्याच्याविरुद्ध कळमणा पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचे चार गुन्हे दाखल आहेत.
३१ मे २०२६ रोजी तेजाजीनगर येथील रहिवासी शेख रजाक शेख नबी (वय ५८) यांची होंडा अॅक्टिव्हा (MH-49 CY 2337) चोरीला गेल्याची तक्रार कळमणा पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा माग काढला.
तपासादरम्यान आरोपी निलेश छगन देवगडे हा लॉक नसलेल्या वाहनांवर पाळत ठेवून संधी साधत दुचाकी चोरी करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता त्याने चार दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपी गल्लीबोळांत फिरून लॉक नसलेल्या किंवा निष्काळजीपणे उभ्या केलेल्या दुचाकी हेरायचा. त्यानंतर वाहन काही अंतर ढकलत नेऊन सुरू करून पसार होत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून जप्त केलेल्या वाहनांमध्ये होंडा अॅक्टिव्हा MH-49 CY 2337, होंडा अॅक्टिव्हा MH-49 T 5435, होंडा अॅक्टिव्हा MH-49 BC 1232, होंडा अॅक्टिव्हा MH-31 DU 2567, या चार दुचाकींचा समावेश असून त्यांची एकूण किंमत १ लाख २० हजार रुपये आहे.
तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपीने विज्ञान शाखेतून बारावीपर्यंत शिक्षण घेतले असून तो बुद्धिमान असल्याचे पोलिस तपासात समोर आले. मात्र वाईट संगत आणि झटपट पैसा कमावण्याच्या हव्यासातून त्याने गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारल्याचे निष्पन्न झाले.
वाहन चोरीच्या घटनांचा तपास करताना पोलिसांनी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपीची मोडस ऑपरेंडी (गुन्हा करण्याची पद्धत) लक्षात घेऊन त्याचा शोध घेण्यात आला. अखेर गुलमोहर नगर परिसरात सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने चार दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण) वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-५) निन्यानंद झा व सहायक पोलिस आयुक्त (, कळमना विभाग) रोहीत ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) करिम पठाण, पोउपनि गजानन राऊत, पोहेकॉ प्रमोद कंगाले, विशाल भेसारे, पोशि नितीन मिश्रा, ललित शेंडे, अविनाश गालवंशी आणि अजय गटलेवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
Author: संतोष तायडे
संपादक











