अल्पवयीन मुलीचे अपहरण, इस्टाग्रामवर टाकला बसमधील फ़ोटो!

– अपहरणाचा धक्कादायक प्रकार, आरोपी यश शेलारेविरुद्ध गुन्हा दाखल
– सक्करदरा पोलिसांना तीन महिने लोटूनही शोध घेण्यात आले अपयश

The Exposer
नागपूर : सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १३ वर्षे ९ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीचे कथित अपहरण केल्याप्रकरणी यश अविनाश शेलारे (वय अंदाजे १९ वर्षे), रा. गोरसिया कॉलनी, गोल्डन मशिदीजवळ, नागपूर याच्याविरुद्ध सक्करदरा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 137(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीने मुलीला फूस लावून अपहरण करुन नेले. आणि अपहरणाचा बसमधील फ़ोटो इस्टाग्रामवर टाकला. त्यामुळे ही समाज माध्यमावरील पोस्ट आव्हान ठरली असतांना तीन महिने लोटूनही या दोघांचा शोध घेण्यात सक्करदरा पोलिसांना अपयश आल्याचा आरोप आहॆ.

याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी नोंदविलेल्या एफआयआरनुसार, १७ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास संबंधित अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी तिचा शोध घेत असताना तिचा मोबाईलही बंद लागत होता. तपासादरम्यान मुलीच्या मैत्रिणीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ती आरोपी यश अविनाश शेलारे याच्यासोबत गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

त्यानंतर कुटुंबीयांनी आरोपीचे इन्स्टाग्राम खाते तपासले असता त्यावर अल्पवयीन मुलीसोबतचा बसमधील फोटो अपलोड करण्यात आल्याचे निदर्शनास आले. यानंतर मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय अधिक बळावल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी सक्करदरा पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0211/2026 नोंदविण्यात आला आहॆ.

जिल्हा बाल संरक्षण समितीने घेतली गंभीर दखल

सदर प्रकरणी जिल्हा बाल संरक्षण समितीने गंभीर दखल घेतली असून आता पर्यंत घेण्यात आलेला शोध, व यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना याबाबतचा अहवाल सक्करदरा पोलिसांना सादर करण्यास म्हटले आहॆ. असे असूनही जवळपास तीन महिने लोटून गेले, मात्र अल्पवयीन मुलगी व तिचे अपहरण करणाऱ्या आरोपीचा अद्यापपर्यंत शोध घेण्यात सक्करदरा पोलिसांना अपयश आल्याचे दिसून येते.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More