The Exposer
नागपूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, नागपूर शहर यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण व पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता मोमीनपुरा येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाजात सत्य, निर्भीड पत्रकारिता आणि जनजागृतीचे कार्य करणाऱ्या पत्रकार बांधवांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. पत्रकारांच्या सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रभक्तीपूर्ण आणि सामाजिक बांधिलकीच्या कार्यक्रमास नागरिकांनी तसेच पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, नागपूर शहरचे कार्याध्यक्ष क्षितिज गायकवाड यांनी केले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















