स्वातंत्र्य दिनी RPIतर्फे ध्वजारोहण; पत्रकारांचा सन्मान करून संविधानिक मूल्यांच्या रक्षणाचा संकल्प

The Exposer
नागपूर : स्वातंत्र्य दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI), नागपूर शहराच्या वतीने ध्वजारोहण तसेच पत्रकार सन्मान सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. देशभक्तीपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात संविधानिक मूल्ये, सामाजिक न्याय आणि लोकशाही बळकट करण्याचा संकल्प करण्यात आला.

वरिष्ठ पत्रकार अभय यादव यांचा सत्कार करतांना रिपाई नेते प्रकाश कुंभे

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नागपूर प्रदेशाध्यक्ष प्रकाश कुंभे होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून, रिब्लिकन नेते दिनेश गोडघाटे, वरिष्ठ पत्रकार अभय यादव, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक पुरुष पंडागळे उपस्थित होते.

वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांचा सत्कार करतांना रिपाई नेते दिनेश गोडघाटे

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून समाजातील विविध प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणाऱ्या पत्रकारांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी अभय यादव, जनार्दनजी मून, संतोष तायडे आणि अशोक माटे यांचा सत्कार करून त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा गौरव करण्यात आला.

वरिष्ठ पत्रकार संतोष तायडे यांचा सत्कार करतांना रिपाई नेते प्रकाश कुंभे, रिपाई नेते क्षितिज गायकवाड

कार्यक्रमाचे प्रास्ताविक RPI नागपूर शहराचे कार्याध्यक्ष क्षितिज गायकवाड यांनी केले. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या संविधानिक मूल्यांच्या संरक्षणासाठी रिपब्लिकन चळवळीने अधिक प्रभावीपणे कार्य करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन RPI नागपूर शहराचे महासचिव रजतजी महेशगवळी यांनी केले.

पत्रकार अशोक माटे यांचा सत्कार करतांना आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक पुरुष पंडागळे, रिपाई नेते दिनेश गोडघाटे, रिपाई नेते क्षितिज गायकवाड

यावेळी नागपूर प्रदेश उपाध्यक्ष विजयजी महेशगवळी, नागपूर शहर उपाध्यक्ष सुरेश खोब्रागडे, नागपूर शहर सचिव मनोज वासनिक, संघटन सचिव आशिष मेश्राम, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर घाडगे यांच्यासह रिपाई पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाला उपस्थित शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व रिपाई पदाधिकारी, कार्यकर्ते

पत्रकारांचा सन्मान हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमातून संविधानिक मूल्ये, सामाजिक न्याय आणि लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More