कर्तव्यनिष्ठ सेवेचा गौरव! पोलिस निरीक्षक किरण चौगले यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचा ‘उत्कृष्ट सेवा पदक’

– पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मानाचा सन्मान, सेवाकार्यातील उल्लेखनीय योगदानाची दखल

The Exposer
सांगली : सेवेत उल्लेखनीय योगदान, कर्तव्यनिष्ठा आणि उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत पोलिस निरीक्षक किरण चौगले यांना केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने प्रदान करण्यात येणारे ‘Medal for Excellence in Service’ (उत्कृष्ट सेवा पदक) प्रदान करण्यात आले. सांगलीचे पालकमंत्री मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात आला.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मिळालेला हा प्रतिष्ठेचा सन्मान पोलिस निरीक्षक किरण चौगले यांच्या सेवाकार्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. पोलिस दलात कर्तव्य बजावताना दाखविलेली निष्ठा, प्रामाणिकपणा, जबाबदारीची जाणीव आणि उल्लेखनीय सेवा याची दखल घेत त्यांना या पदकाने गौरविण्यात आले.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पदक स्वीकारताना पोलिस निरीक्षक किरण चौगले यांच्यासाठी हा क्षण अत्यंत अभिमानाचा आणि अविस्मरणीय ठरला. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मिळालेला हा सन्मान भविष्यात अधिक निष्ठेने आणि समर्पित भावनेने सेवा बजावण्यासाठी प्रेरणादायी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

हा सन्मान केवळ वैयक्तिक गौरव नसून, आपल्या सेवाप्रवासात सहकार्य करणारे वरिष्ठ अधिकारी, सहकारी पोलिस कर्मचारी तसेच कुटुंबीय यांच्या योगदानाचाही गौरव असल्याचे चौगले यांनी नमूद केले.

‘उत्कृष्ट सेवेचा सन्मान, कर्तव्यनिष्ठेला नवी ऊर्जा!’ अशा अभिमानास्पद वातावरणात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पोलिस निरीक्षक किरण चौगले यांच्या या गौरवामुळे पोलिस दलातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More