– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकाराने काठमांडूहून बिहारकडे प्रवास सुरू; बस आणि रेल्वेने नागपूरला आणण्याची व्यवस्था
The Exposer
नागपूर : नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या १०६ प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे या सर्व प्रवाशांचा पुढील परतीचा प्रवास सुरू झाला असून, काठमांडूहून ते दानापूर (बिहार)च्या दिशेने सुखरूप रवाना झाले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दूरध्वनीनंतर नेपाळचे खासदार संदीप राणा यांनी तातडीने सहकार्य करत काठमांडू ते जनकपूर या प्रवासासाठी स्थानिक पातळीवर चार मिनी बसची व्यवस्था केली. त्यामुळे नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरकरांच्या सुरक्षित परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरकरांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला.

हे सर्व १०६ प्रवासी उद्या सकाळपर्यंत जनकपूर-बिहार सीमेवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर त्यांना दानापूरपर्यंत नेण्यासाठी स्वतंत्र बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
दानापूर येथे पोहोचल्यानंतर पुढील प्रवासासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली असून, त्याद्वारे या सर्व प्रवाशांना नागपूरला परत आणले जाणार आहे.
नेपाळमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या नागपूरकरांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे अखेर १०६ कुटुंबीयांच्या परतीचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे प्रवाशांसह त्यांच्या कुटुंबीयांनीही मोठा दिलासा व्यक्त केला आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















